जिल्हा भाजपच्या स्वागताने डोंबिवलीकर भारावले

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समवेत २५० कार्यकर्ते सिंधुदुर्गात
कुडाळ रेल्वे स्थानकावर झाले स्वागत
प्रतिनिधी । कुडाळ : राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्या समवेत डोंबिवली येथून आलेल्या दोनशे पन्नासहून अधिक भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांचे सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने कुडाळ रेल्वे स्टेशन येथे दिमाखात स्वागत करण्यात आले
आज सकाळी कुडाळ रेल्वे स्टेशन येथे पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्या समवेत डोंबिवली येथील पदाधिकारी, कार्यकर्ते ,महिला यांचे आगमन झाले हे सर्व पदाधिकारी पालकमंत्री यांच्या केसरी येथील निवासस्थानी होणाऱ्या कार्यक्रमासाठी आले आहेत, तीन दिवस जिल्हा दॉरा करणार आहेत, त्यांच्या स्वागतप्रसंगी जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत माजी आमदार राजन तेली, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई, प्रदेश पदाधिकारी अतुल काळसेकर, प्रदेश सदस्य बंड्या सावंत, महिला प्रदेश प्रतिनिधी संध्या तेरसे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष भाई सावंत, तालुका अध्यक्ष दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, राजू राऊळ, जिल्हा सरचिटणीस विनायक राणे ,युवा मोर्चा पदाधिकारी रुपेश कानडे, पप्या तवटे, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, प्रदिप माने, निलेश तेंडूलकर, साक्षी सावंत, साधना माडये, निलेश परब, प्रिया पांचाळ, अनुष्का आकेरकर, आदित्य राऊळ आदी उपस्थित होते. जिल्हा भाजपच्या स्वागताने डोंबिवलीवासिय भारावून गेले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.