खारेपाटण येथील शिवसेनेची दहीहंडी फोडली राजापूर महिला गोविंदा पथकाने

किरण सामंत पुरस्कृत संजय आंग्रे, सूकांत वरूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते आयोजन
खारेपाटण येथील शिंदे शिवसेनेच्या वतीने किरण उर्फ भैया सामंत पुरस्कृत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे व युवा सेना जिल्हाप्रमुख सुकांत वरूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी उत्सव आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजापूर येथील महिला गोविंदा पथकाकडून दहीहंडी फोडण्यात आली.
दरम्यान दहीहंडी येणाऱ्या पथकाचा येथील शिंदे शिवसेनेच्या वतीने शाल, श्रीफळ व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम या दहीकाला उत्सवाचे खास आकर्षण ठरले. यावेळी खारेपाटण पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दरम्यान यावेळी राम कृष्णाची रथ मधून भव्य मिरवणूक देखील खारेपाटण शहरात काढण्यात आली.
शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या तर किरण सामंत यांना भावी खासदार म्हणून शुभेच्छा दिल्या तसेच प्रमोद जठार यांनी संजय आंग्रे यांना भावी आमदार म्हणून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं नियोजन युवा सेना जिल्हाप्रमुख श्री.सुकांत वरूणकर उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव,लियाकत काझी सरपंच प्राची इस्वलकर ग्रामपंचायत सदस्य गुरुप्रसाद शिंदे खारेपाटण तंटामुक्ती अध्यक्ष सुहास राऊत या नंदिनी पराडकर, या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे चांगले नियोजन केले.
यावेळी ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर,विधानसभा प्रमुख संदेश पटेल,जिल्हा खजिनदार भास्कर राणें,कणकवली तालुकाप्रमुख शरद वायंगणकर,राजापूर तालुकाप्रमुख
अश्फाक हज्जू,संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीमंगेश ब्रह्मदांडे;
ग्रामपंचायत सदस्य;
सुधाकर ढेकणे, नंदिनी पराडकर,लियाकत काझी,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते
अस्मिता गिडाळे, खारेपाटण