मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “जबाब दो” आंदोलन

आमदार वैभव नाईक आंदोलनात झाले सहभागी

       जालना येथे मराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  "जबाब दो  आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक  सहभागी झाले होते.

     यावेळी आमदार वैभव नाईक यांनी आपले विचार व्यक्त करताना  जालना येथे मराठा समाज बांधवांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. मराठा समाजाचे आंदोलन अधिक तीव्र होऊ नये यासाठी काहींनी जालना येथील मराठा समाजाचे आंदोलन लाठीमार करून दडपण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही वर्षात अनेक सरकारच्या विरोधात  मराठा समाजाने आंदोलने केली, मोर्चा काढले परंतु यापूर्वी कधीही लाठीमार झाला नव्हता मात्र जालना येथे लाठीमार झाल्याने संपूर्ण राज्यातील मराठा बांधव पेटून उठला आहे. सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावाच लागेल. असे आ. वैभव नाईक यांनी सांगितले.
      मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक ऍड.सुहास सावंत  यांनीही जालना येथील घटनेचा तीव्र विरोध करत मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन केले.यावेळी सुंदर सावंत, सीताराम गावडे, अमरसेन सावंत,जान्हवी सावंत,बबन बोभाटे,  मंदार शिरसाट,राजू कविटकर,बाबा सावंत, दिनेश वारंग,योगेश धुरी,मिलिंद परब,रुपेश पावसकर आदि उपस्थित होते.
error: Content is protected !!