पुराव्याअभावी संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता

संशयीत आरोपीतर्फे ऍड. मिलिंद सावंत यांनी काम पाहिले

गाव मौजे वागदे ता. कणकवली येथील श्री. उल्हास अनंत गावडे यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी आरोपीविरूद्ध सबळ पुरावा न आल्याने पुराव्याअभावी संशयीत आरोपी श्री. जयराम दत्ताराम तेजम यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कणकवली येथील न्यायाधिश श्री. टी. एच. शेख यांनी निर्णय दिला. संशयित आरोपींचे वतीने ऍड मिलिंद सावंत यांनी काम पाहिले.
दिनांक १४/११/२०१९ रोजी रात्री ८.०० वाजता फिर्यादी हे घरामध्ये असता, आरोपी यांनी घरात घुसून पुर्ववादातुन चिव्याचे दांडयाने फिर्यादी यांना शिवगाळ व मारहाण करून दुखापत केल्याची फिर्याद श्री. उल्हास अनंत गावडे यांनी दिलेली होती. त्यानुसार आरोपींविरूद्ध भा.द.वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर खटला मे. कोर्टासमोर गुणदोषांवर चालला असता आरोपींविरूद्ध सबळ पुरावा न मिळाल्यामुळे व केसमध्ये संशय निर्माण झाल्याने पुराव्याअभावी आरोपी श्री. जयराम दत्ताराम तेजम यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!