सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी कणकवलीतील “त्या” युवतीवर अखेर गुन्हा दाखल

पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याबाबत केली होती इंस्टाग्रामवर पोस्ट
दहशतवाद विरोधी पथकाकडून देखील करण्यात आली होती चौकशी
इंस्टाग्राम वर पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासह, पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा अशा आशयाची पोस्ट टाकत तसेच हिंदू देव-देवतांची बदनामी करून धार्मिक भावना दुखावणे व सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी कणकवली तालुक्यातील एका गावातील त्या युवतीवर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आलेल्या वेगवेगळ्या संघटना, पक्षांकडून निवेदनानुसार या प्रकरणी गुप्त चौकशी करत सदर पोस्ट बाबत खातर जमा करून त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली. याबाबत पोलीस हवालदार किरण मेथे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या युवतीवर
153(a), 505(2), नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या युवतीच्या या पोस्ट बाबत दहशतवाद विरोधी पथकाकडून देखील चौकशी करण्यात आली होती. तसेच कणकवली पोलिसांनी देखील त्या युवतीकडे याप्रकरणी कसून चौकशी केली होती. त्यामुळे या चौकशीत काही बाबी निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
दिगंबर वालावलकर/ कणकवली