माजी स्वातंत्र्य सैनिक पंढरीनाथ घाडी यांचे निधन

   वरवडे गावातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक पंढरीनाथ घाडी यांचे ३१ ऑगस्ट रोजी वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाने निधन झाले.१९६५ आणि १९७१ च्या पाकिस्तान बरोबरच्या युद्धात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता.१ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांच्यावरती वरवडे गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. 
यावेळी घाडीगांवकर समाजातील माजी सैनिक दत्तगुरु गावकर ( कुपवडे ) यांनी लष्करी पद्धतीने मानवंदना त्यांना दिली.  त्यांच्याबरोबर त्यांचे इतर माजी सैनिक सहकारी संतोष मुसळे , सुहास विचारे आणि दयाळ गांवकर देखील उपस्थित होते. क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाजाच्या वतीने मध्यवर्ती कार्यकारणी सदस्य विजय गांवकर,सिंधुदुर्ग विभागाचे अध्यक्ष सूर्यकांत घाडी तसेच वरवडे गावातील घाडीगांवकर आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांची फुलांनी सजवलेल्या गाडीतून अंत्य यात्रा काढण्यात आली. तसेच पंढरीनाथ घाडी अमर रहे अशा घोषणा देत त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली.
त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे,तीन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.मैत्री परिवारातील सदस्य संतोष घाडी यांचे ते वडील होत.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!