श्री स्वामी समर्थ मठ कळसुली हर्डी येथे भव्य दहिहंडी उत्सव

५५,५५५ रुपये रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह

प्रेमदया प्रतिष्ठान, आणि श्री स्वामी समर्थ मठ कळसुली यांचे आयोजन

प्रेमदया प्रतिष्ठान, (रजि.) मुंबई आणि श्री स्वामी समर्थ मठ (रजि.) कळसुली श्री.हनुमंत सावंत कळसुली यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. ७ सप्टेंबर रोजी भव्य दहीहंडी उत्सव कणकवली तालुक्यातील श्री.स्वामी समर्थ मठ कळसुली हर्डी येथे आयोजित करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकण विभातील ग्रामीण भागातील एवढी मोठी भव्य दिव्य अशी ही दहिहंडी आहे.ग्रामीण भागात अशी भव्य दिव्य दहिहंडी प्रथमच होत आहे.रोख बक्षीस ५५,५५५/- आणि सन्मानचिन्ह असे बक्षिस आहे.कळसुली हर्डी येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे हा दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे.प्रेमदया प्रतिष्ठान, (रजि.) मुंबई मंडळाचे दहिहंडी चे पहिले वर्ष आहे.

कोल्हापूर येथील डीजे आणि लाईट शो खास आकर्षण आहे.दहिहंडीच्या माध्यमातून मनोरंजनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील गोविंदा पथकाने दहिहंडी उत्सवात सहभागी होऊन. दहिहंडी उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा. असे आवाहन प्रेमदया प्रतिष्ठान (रजि) च्या वतीने करण्यात येत आहे.

दहिहंडी उत्सवात सहभागी होण्यासाठी गोविंदा पथकांनी
प्रेमदया प्रतिष्ठान, (रजि.) मुंबई संस्थापक यांच्याकडून अधीक महितीसाठी 9405239966/
9403717460 या भ्रमणध्वनी वर
संपर्क करावा.आणि आपला सहभाग निश्चित करावा.असे आवाहन प्रेमदया प्रतिष्ठान, (रजि.) मुंबई संस्थापक अध्यक्ष श्री.हनुमंत सावंत यांनी केले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!