समाज विघातक पोस्ट टाकणाऱ्या त्या युवतीवर कारवाई करा

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यासह शिष्टमंडळाची पोलिसांकडे मागणी
कणकवली मध्ये परगावातून आलेल्या एका युवतीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर पाकिस्तानच्या स्वातंत्र दिन उत्साहात साजरा करणे व हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेऊन सोशल मीडिया मध्ये प्रसिद्ध केला. तरी समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने सदर युवती ची योग्य ती चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदरचा प्रकार हा समाज विघातक कृत्य आहे. त्याचा आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना अल्पसंख्यांक समजाकडून जाहीर निषेध करतो असे देखील अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अब्दुल बटवाले यांनी म्हटले आहे.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, सचिन आचरेकर, राजू राठोड, निसार शेख, माजी नगरसेवक कन्हैया पारकर, अनुप वारंग, विलास गुडेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.
कणकवली /प्रतिनिधी





