डाॅ .कौस्तुभ बावधनकर करणार ‘पार्किंन्सोनिझम आणि मूव्हमेंट डिसाॅर्डर परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

कणकवली तालुक्याच्या शिरपेचात मनाचा तुरा
युरोपमधील डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे भरलेल्या जागतिक ‘पार्किंन्सोनिझम आणि मूव्हमेंट डिसाॅर्डर परिषदेमध्ये (World congress of Parkinson and movement disorder.)डाॅ .कौस्तुभ प्र.बावधनकर यांना भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा सर्वोच्च बहुमान मिळाला आहे.या परिषदेत डाॅ. कौस्तुभ यांनी जगात अत्यंत दुर्मीळ असणाऱ्या IgLON5 आणि DRPLA या स्वतः संशोधित केलेल्या मेंदूसंबधीत केसेस सादर करून जागतिक न्युराॅलाॅजी क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.परिषदेला संपूर्ण जगातून अंदाजे अडीज ते तीन हजार न्यूराॅलाॅजिस्ट उपस्थित होते.परिषदेचे अध्यक्ष डाॅ.ॲन्थनी लँग आणि डाॅ .कैलास भाटिया (लंडन) या जागतिक कीर्तीच्या न्यूराॅलाॅजिस्टनी डाॅ. कौस्तुभ यांचे अभिनंदन केले आहे.
डाॅ.कौस्तुभ हे मुंबई च्या.ई.एम.हाॅस्पिटल आणि जी.एस.मेडिकल कॉलेज मध्ये न्युराॅलाॅजीमधील डी.एम.हे सर्वोच्च शिक्षण घेत आहेत.डाॅ .कौस्तुभ बावधनकर हे सिंधुदुर्ग, तळेरे,कणकवली,येथील डाॅ .प्रकाश व डाॅ .अनुपमा बावधनकर यांचे चिरंजीव आहेत.
कणकवली प्रतिनिधी





