नारळ लढवणे स्पर्धेत खुशाल , वेदांत, समिक्षा गावकर ठरले विजेते

आचरा येथे नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने स्पर्धेचे आयोजन

आचरा येथे नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडी मंडळातर्फे कलश मिरवणूक काढत नारळ लढवण्याची महिला आणि पुरुष व बाल गटासाठी नारळ लढविणे स्पर्धा आयोजित केली होती यात मोठया गटातून खुशाल हूर्णेकर, महिला गटातून समिक्षा गावकर तर लहान गटातून वेदांत जोशी यांनी क्रमांक पटकावले. विजेत्याना चषक व रोख रक्कमेचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

या स्पर्धेत मोठा गट पुरुष मधून प्रथम क्रमांक खुशाल हूर्णेकर, द्वितीय संतोष जोशी, लहान गट प्रथम क्रमांक वेदांत जोशी, द्वितीय युगांत धुरी, महिला गटातून प्रथम क्रमांक सौ समिक्षा गावकर, द्वितीय मंदाकिनी टिकम यांनी प्राप्त केलेत. विजेत्यांना मान्यवरंच्या हस्ते चषक व रोख रक्कमेचे पारितोषिक देण्यात आले.

यावेळी ग्रामोन्नती मंडळ अध्यक्ष श्री नारायण कुबल माजी अध्यक्ष श्री अनिल करंजे उपाध्यक्ष मंदार खोबरेकर मधला वाडा ग्रामस्तसभा आचरा पिरावाडी श्री शरद धुरी कार्यकारीनी सदस्य श्री विठ्ठल धुरी,श्री सतीश तळवडकर, श्री दिनकर कुबल, जयदीप कुबल,निवृत्ती जोशी, परेश तारि,महादेव जोशी, श्री सुर्यकांत धुरी, भालचंद्र कुबल ,श्री नरेंद्र कोळंबकर ,श्री लवु तारी व ग्रामस्थ उपस्थित होते

आचरा प्रतिनिधी

error: Content is protected !!