*बुद्धांचा हेतूवाद म्हणजेच विज्ञानवादच जीवन सुखी बनवेल .*
                विजय चौकेकर
कणकवली( वार्ताहर .)
       तथागत गौतम बुद्धांना मानवजातीला  बुद्धीवादी बनवायचे होते . माणूस बुद्धीवादी म्हणजेच विज्ञानवादी बनल्यास तो स्वतंत्रता पूर्वक सत्याचा शोध लावण्यास सिद्ध होईल . आणि  समाजात ज्या भ्रामक समजूती आहेत त्याचे उगमस्थानच नष्ट करेल . म्हणूनच बुद्धाचा हेतूवाद म्हणजेच विज्ञानवाद जीवनात आचरला तरच माणूस सुखी होईल . असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी केले .

पियाळी बौद्ध विकास मंडळ मुंबई शाखा पियाळी यांनी पियाळी बौद्धवाडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग आणि जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती (PIMC ) सिंधुदुर्ग यांच्या संयुक विद्यमाने आयोजित केलेल्या *अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा* आणि जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रात्यक्षिकासह व्याख्यानात ते बोलत होते .
     यावेळी त्यांच्या सोबत विचार मंचावर पियाळी बौद्ध विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष अशोक कदम , पियाळी बौद्ध विकास मंडळाचे सचिव तेजराम कदम , प्रज्ञा महिला मंडळाच्या अध्यक्षा मनाली कदम , सचिव चिंती कदम , ग्रामिण पियाळी बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष तथा केंद्रप्रमुख गौतम तांबे ‘ सचिव अंकुश कदम , सुधांश तांबे , राहुल कदम आदी उपस्थित होते .

     विजय चौकेकर यांनी संपूर्ण कायद्याची उपस्थितांना विविध प्रात्यक्षिकासह माहिती करून दिली . जादूटोणा विरोधी कायदा देव आणि धर्माच्या विरोधात नसल्याचे आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम हे देव आणि धर्माच्या विरोधात कधीच नव्हते तर देव आणि धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या सर्व जाती धर्मातील भोंदू बाबांच्या विरोधातील होते .  असे सांगितले .
पियाळी बौद्ध विकास मंडळ गावशाखेचे  अध्यक्ष गौतम तोबे सर यांनी  विजय चौकेकर यांनी आपल्या शालेय जीवनात अनेक विद्यार्थांना सुसंस्कारित केले तर आता सेवानिवृत्तीचा काळही समाज प्रबोधनासाठी खर्च करीत असून शाळा , विद्यालय , महाविद्यालय आणि गावोगावी जाऊन  अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा या व्याख्यानमालेतून वैज्ञानिक पिढी आणि समाज घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत . त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून शाळ श्रीफळ देऊन गौरवित  असल्याचे सांगून  त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम तांबे  सरांनी केले तर आभार  तेजराज कदम यांनी मानले
.

Read More*बुद्धांचा हेतूवाद म्हणजेच विज्ञानवादच जीवन सुखी बनवेल .*

संशय घेणे हे उध्दव ठाकरे यांचे सततचे रडगाणे – उमेश पाटील* मुंबई (प्रतिनिधी) – काम करणार्‍या प्रशासकीय यंत्रणेवर, निवडणूक यंत्रणेवर संशय घेणे हे उध्दव ठाकरे यांचे सततचे रडगाणे आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी माध्यमांशी…

Read More

तर पुन्हा अजित दादांना वरीष्ठांनी उपमुख्यमंत्री केले असते का? – उमेश पाटील* मुंबई (प्रतिनिधी) – अजितदादांनी घेतलेला पहाटेचा शपथविधी ही गद्दारी समजली गेली आणि तसे चित्र निर्माण करण्यात आले. अजितदादांनी तो निर्णय परस्पर घेतला होता असे सांगितले गेले परंतु वस्तुस्थिती तशी…

Read More

शेर्पे मारहाण प्रकरणी माजी सभापती बाळा जठार, दिलीप तळेकर, उपसरपंच नारायण शेट्ये यांना सशर्थ जामीन

संशयीत आरोपींच्या वतीने ॲड.उमेश सावंत यांचा युक्तिवाद लाठया काठयांनी केली होती जबर मारहाण लोकसभा निवडणुक तील राजकीय पूर्व वैमनस्यातून वेर्ले वरचीवाडी येथील माजी सरपंच व शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्ते रामचंद्र बाळकृष्ण राऊत (५८) यांना बेकायदा जमावाने मारहाण करून त्यांच्याकडील ३५००…

Read Moreशेर्पे मारहाण प्रकरणी माजी सभापती बाळा जठार, दिलीप तळेकर, उपसरपंच नारायण शेट्ये यांना सशर्थ जामीन

चक्रीवादळामुळे कणकवली तालुक्यात नुकसानीचा आकडा कोटीच्या घरात

सलग दुसऱ्या दिवशी पंचनामे करण्याचे काम सुरूच अपवाद वगळता कृषी विभाग मात्र सुशेगात कणकवली विभागात महावितरण चे 120 पोल व तारा तुटून तीस लाखाहून अधिक नुकसान कणकवली तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा कोटीच्या घरात पोचला आहे. अजून दोन दिवस या…

Read Moreचक्रीवादळामुळे कणकवली तालुक्यात नुकसानीचा आकडा कोटीच्या घरात

कणकवलीत नुकसानग्रस्तांना तोक्ते वादळ निकषांपेक्षा जास्त मदत द्या!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सतीश सावंत यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी योग्य मदत न मिळाल्यास शिवसेना आंदोलन करणार दिगंबर वालावलकर कणकवली

Read Moreकणकवलीत नुकसानग्रस्तांना तोक्ते वादळ निकषांपेक्षा जास्त मदत द्या!

हरकुळ बु. मध्ये चक्रीवादळाचे थैमान, शेकडो घरांना फटका!

कणकवली तालुक्यात चक्रीवादळाने नुकसानीची संख्या कोटीच्या घरात जाण्याची शक्यता हरकुळ बुद्रुक शेखवाडी मध्येच 20 हुन अधिक घरांचे नुकसान कणकवली तालुक्‍यातील हरकुळ बुद्रूकसह हळवल, कळसुली, साकेडी गावातील घरांना चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळी पावसात एकट्या हरकूळ गावातच सुमारे १०० हुन अधिक…

Read Moreहरकुळ बु. मध्ये चक्रीवादळाचे थैमान, शेकडो घरांना फटका!

मसुरे गडघेरावाडी दत्तमंदिरचा १४ व १५ मे रोजी वर्धापनदिन 
  मसुरे प्रतिनिधी

  मसुरे गडघेरावाडी येथील श्री दत्त मंदिराचा ११ वा वर्धापनदिन सोहळा  १४ व १५ मे  रोजी संपन्न होत आहे. या निमित्त
१४ मे २०२४
सकाळी ९.०० वा. श्री दत्ताभिषेक, सकाळी
११.०० वा. आरती व तीर्थप्रसाद, दुपारी
१.०० वा. महाप्रसाद,
सायंकाळी ७.०० वा.
आरती व तीर्थप्रसाद, रात्री १०.०० वा. रेकॉर्ड डान्स.
१५ मे रोजी सकाळी
९.०० वा.  श्री सत्यनारायणाची महापूजा, सकाळी
११.०० वा.आरती व तीर्थप्रसाद, दुपारी
१.०० वा. महाप्रसाद
सायंकाळी ७.०० वा.
आरती व तीर्थप्रसाद
रात्री ९.३० वा. २०-२०डबलबारी भजनाचा  जंगी सामना
बुवा- श्री. विजय उर्फ गुंडू सावंत (श्री हनुमान प्रसादिक भजन मंडळ वर्दे, कुडाळ) विरुद्ध
बुवा- श्री. संतोष जोईल
(श्री भूतेश्वर प्रसादिक भजन मंडळ खुडी, देवगड) या दोन भजनी बुवांमध्ये होणार आहे. उपस्थितीचे आवाहन
श्री दत्तमंदिर मसुरे गडघेरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Read Moreमसुरे गडघेरावाडी दत्तमंदिरचा १४ व १५ मे रोजी वर्धापनदिन 

गौरी बांदेकर रिल्स ग्रुप राज्यात प्रथम

बांदा(प्रतिनिधी)
कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शहर , संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक आयोजित ,चला मराठी बोलूया या विषयावरील  रिल्स स्पर्धेमध्ये बांदा येथील गौरी बांदेकर रिल्स ग्रुपने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.
या रील्स मध्ये गौरी बांदेकर ,अवंती पंडित ,भारती परब ,गजेंद्र कोठावळे, अंकिता पवार यांनी अभिनय साकारला आहे. यामध्ये दिग्दर्शन, संकल्पना, संवाद, एडिटिंग या सर्व बाजू गौरी  बांदेकर यांनी सांभाळल्या आहेत. यापूर्वीही गौरी बांदेकर रील्स ग्रुपने विविध राज्यस्तरीय रिल्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या  रिल्स ग्रुप मधील प्रत्येक कलाकार हा गायन,अभिनय  क्षेत्रात सक्रिय आहे.
या यशाबद्दल या ग्रुपवर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Read Moreगौरी बांदेकर रिल्स ग्रुप राज्यात प्रथम

दिवंगत आदरणीय मदन राजाराम बागवे उर्फ बापू यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन मसुरे(प्रतिनिधि) मसुरा एज्युकेशन सोसायटीचे माजी चिटणीस दिवंगत बापूंनी चार दशकांहून जास्त काळ चिटणीस पदाची धूरा संभाळून संस्थेची शुन्यातून उभारणी त्यांनी केली होती त्याची आठवण पुढील अनेक पिढ्यांपर्यंत लोकांच्या स्मरणात…

Read More

*_असाक्षरांनीही मारली बाजी_* *सिंधुदुर्ग जिल्ह्याचा असाक्षरांच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के* सिंधुदुर्गनगरी, दि.11 (प्रतिनिधि): केंद्रपुरस्कृत उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रम (NBSK) सन 2022-27 अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दि.17 मार्च, 2024 रोजी घेण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी  (FLNAT) परीक्षेला…

Read More

*_जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक_*

*मान्सून कालावधीत पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज*

-जिल्हाधिकारी किशोर तावडे

            सिंधुदुर्ग दि ०९ (जिमाका) पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज असणे आवश्यक आहे. प्रत्येक गावाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून ठेवावा, गावात कोणतीही आपत्तीजनक घटना घडल्यास त्याची त्वरित माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास (०२३६२)२२८८४७ /१०७७ या क्रमांकावर देण्याच्या सूचना आपल्या प्रत्येक गावातील ग्रामसेवकांना देण्यात याव्यात,तसेच संभाव्य पूरपरिस्थितीत कोणतीही घटना घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून सर्व विभागांनी समन्वयाने परिस्थिती हाताळावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे,  आदी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी म्हणाले, रस्त्यांवर झाड पडल्यास ते झाड त्वरित बाजूला करण्याबाबत योग्य ते नियोजन करावे. तसेच अशा रस्त्यांवरची धोकादायक झाडे/ फांद्या मान्सून कालावधीपूर्वी बाजूला करण्यात याव्यात, मान्सूनपूर्व कालावधीत  महामार्गाच्या दुतर्फा साईड पट्टी ,मातीचा भराव टाकावा, राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक व अपघातप्रवण जागांची निवड व या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, नगरपालिका क्षेत्रातील नाले सफाईची कामे त्वरित हाती घेण्यात यावीत व पावसाळ्यापूर्वी ती पूर्ण करावीत, नगरपालिका अखत्यारीतील रस्त्यांची डागडुजी करून घेण्यात यावी, पावसाळा कालावधीत नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होईल याबाबत दक्षता घेण्यात यावीत, मान्सून कालावधीत नगरपालिका क्षेत्र स्वच्छ राहील याची दक्षता घेण्यात यावी, अस्वच्छतेमुळे कोणतेही आजार पसरणार  नाहीत याची काळजी घ्यावी, पावसाळा कालावधीतील साथीच्या आजाराचे नियंत्रण करण्यासाठी योग्य ते नियोजन करावे, पंचायत समिती अंतर्गत विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांची बैठक घेवून आपत्कालीन परिस्थिती तालुक्यास उद्भवल्यास करावयाच्या नियोजनाबाबत विचारविनिमय करावा असेही ते म्हणाले.

          मुख्य कार्यकारी अधिकारी श्री देशमुख म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दक्ष राहावे, पावसाळ्या दरम्यान उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांबाबत जनजागृती करावी, मृत जनावरांची विल्हेवाट लावावी, सूक्ष्म नियोजन करुन परिस्थिती हाताळावी असेही ते म्हणाले.

          बैठकीच्या सुरूवातीला निवासी उपजिल्हाधिकारी श्री सुकटे यांनी सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्प माहिती, मान्सून कालावधीतील मुख्य धोके, पूर येण्याची कारणे, दरड कोसळण्याची कारणे, आपत्ती व्यवस्थापनांतर्गत शोध व बचाव करिता घेण्यात आलेल्या साहित्याची सद्यस्थिती आदींची माहिती दिली.

००० ०००

Read More*_जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक_*

error: Content is protected !!