
देवी भगवती माहेरस्वारी सोहळा १० मे रोजी
मसुरे प्रतिनिधी देवगड तालुक्यातील मुणगे गावची ग्रामदेवता श्री भगवती देवीचा माहेरस्वारी सोहळा १० मे रोजी होणार आहे. देवी भगवती मुणगे गावातील कारीवणेवाडी येथे पाडावे कुटुंबीयांच्या घरी दर तीन वर्षांनी माहेरपणासाठी जाते. यानिमित्त कारीवणेवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…










