भाजपाच्या कणकवली नगरपंचायत च्या प्रचाराचा उद्या शुभारंभ

स्वयंभू मंदिरात ग्रामदेवतेला घालणार साकडे उपस्थित राहण्याचे समीर नलावडे यांचे आवाहन कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीचा भाजपा कडून प्रचाराच्या शुभारंभ कणकवली ते ग्रामदैवत स्वयंभू मंदिरात गुरुवार 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. कणकवली नगरपंचायत करिता भाजपा च्या इच्छुक…

कणकवली निवडणुकीत आम आदमी पक्ष काँग्रेससोबत!

महाविकास आघाडीमध्ये फूट सुरूच समविचारी पक्षांसह तिसऱ्या आघाडीवर उद्या होणार चर्चा जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांची माहिती नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली मतदारसंघात राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. आम आदमी पक्षाने काँग्रेससह समविचारी पक्षांसोबत तिसरी आघाडी उभी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या…

दोडामार्ग येथील मांस वाहतूक करणाऱ्या कार जळीत प्रकरणी 11 जणांना सशर्त जामीन

संशयीतांच्या वतीने ॲड. उमेश सावंत, ॲड. संग्राम देसाई, ॲड. भूषण बिसुरे, ॲड. सुहास साटम यांचा युक्तिवाद दोडामार्ग पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या वीजघर चेकपोस्ट येथे पोलीस कर्मचारी परशुराम सावंत हे बकरा सदृश्य असलेले मांस वाहतूक करणारी स्विफ्ट कार घेऊन पोलीस स्टेशन…

कणकवली शहराच्या राजकारणात लवकरच मोठी घडामोड घडणार?

भाजपाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर पुन्हा कणकवलीत शहर विकास आघाडीचे वारे संभाव्य शहर विकास आघाडीतील प्रमुख नेत्यांमध्ये संपर्कांचा धडाका नुकत्याच सावंतवाडी येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या बैठकीनंतर भाजपाच्या नेत्यांकडून स्वबळाचे संकेत देण्यात आल्यानंतर कणकवली नगरपंचायत निवडणुकी करिता घडामोडींनी पुन्हा वेग घेतला आहे.…

भाजपा सिंधुदुर्गात स्वबळावर निवडणुका लढवणार

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांचे सावंतवाडी येथील बैठकीत आदेश सावंतवाडी मध्ये इच्छुक उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर गर्दी अखेर सावंतवाडी येथे झालेल्या भाजपाच्या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती म्हणून न लढता भाजपा स्वबळावरच लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. भाजपाची प्रदेशाध्यक्ष…

“दुबार” मतदानाला आता बसणार चाप, निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण आदेश

“दुबार” मतदारांबाबत होणार स्थानिक तपासणी “त्या” मतदारांचे हमीपत्र घेत दोन पैकी एकाच ठिकाणी करता येणार मतदान सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार “या” आदेशाची अंमलबजावणी येत्या काही महिन्यांमध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदा, नगरपंचायती च्या निवडणुकीत दुबार मतदान होऊ नये याकरता…

कोंडये येथील नंदु तिरोडकर यांचे निधन

कणकवली तालुक्यातील कोंडये येथील रहिवासी नंदकिशोर उर्फ नंदू वसंत तिरोडकर (68) यांचे रविवारी 2 नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले. गेले काही दिवस त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर मुबई येथे उपचार सुरू होते. याच दरम्यान त्यांचे निधन झाले.…

भाजप जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बॅक संचालक महेश सारंग यांच्या विरोधात सोशल मीडियावर खोटी मोहीम

सावंतवाडी पोलिसांत महेश सारंग यांची तक्रार दाखल सावंतवाडी:जिल्हा बॅक संचालक तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या विरोधात काही व्यक्तींनी सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवून त्यांची खोटी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. या संदर्भात महेश सारंग यांनी आज…

कणकवलीत तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

कणकवली नगरपंचायतीच्या वतीने कलमठ टाकीवरून पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या बिजलीनगर, सोनगेवाडी, किनई, मारुती आळी, गांगोवाडी, आचरा रोड व हायवे या भागातील पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटलेली आहे. त्यामुळे तीचे दुरुस्तीचे काम 30 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात येणार असल्याने 30 ऑक्टोबर…

भाजप विचारांच्या सरपंचांना पालकमंत्री नितेश राणेंनी अडीच वर्षात किती निधी दिला!

माजी आमदार वैभव नाईक यांचा पालकमंत्री नितेश राणे यांना सवाल निधी वाटपात पक्षपातीपणा केला जात असेल तर कर देखील भाजपच्या लोकांकडूनच घ्या कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!