नेरूर – ठाकूरवाडी जि. प. शाळेच्या जागेवरचे अतिक्रमण हटवले

आम. निलेश राणे यांची खंबीर भूमिका ग्रामस्थांनी मानले प्रशासनाचे आभार कुडाळ तालुक्यातील नेरूर – ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर आणि वहिवाटीच्या रस्त्यावर असलेले १३ वर्षांचे जुने अतिक्रमण आमदार निलेश राणे यांच्या खंबीर भूमिकेनंतर अखेर हटवण्यात आले आहे. प्रशासनाने केलेल्या…

कुडाळात हॉटेल मालकाला ग्रामीण रुग्णालयाची नोटीस

अतिक्रमण करून बांधलेले हॉटेल ७ दिवसात पाडण्याचे आदेश कुडाळ : शहरातील राजमाता जिजामाता चौकासमोर असलेल्या कुडाळ ग्रामिण रुग्णालयाच्या जागेमध्ये अनधिकृत हॉटेल बांधून व्यवसाय करणाऱ्या हॉटेल रुचकरच्या मालकाला कुडाळ ग्रामिण रुग्णालय प्रशासनाकडून सदर अनधिकृत बेकायदा अतिक्रमण करून बांधलले हॉटेल स्वखर्चाने सात…

गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती

मंत्री नितेश राणेंची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्राचे वैभव असलेल्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी महायुती सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी सांस्कृतिक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या समितीचे…

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा येथे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम

“तिमिरातून तेजाकडे” या संस्थेचे संस्थापक श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांचे स्पर्धा परीक्षांबाबत मोफत मार्गदर्शन सत्र न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा येथे शनिवार, २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता आयोजित करण्यात आले आहे. या मार्गदर्शन सत्रामध्ये स्पर्धा परीक्षांची…

डिगस येथे “नशामुक्त भारत अभियान – तंबाखूमुक्त युवा अभियान” जनजागृती कार्यक्रम संपन्न

श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी, कुडाळ येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटच्या वतीने व रोटरॅक्ट क्लबच्या सहकार्याने डिगस येथे “नशामुक्त भारत अभियान – तंबाखूमुक्त युवा अभियान” हा जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील युवक, विद्यार्थी…

कणकवली मधील नरडवे प्रकल्पग्रस्त प्रकाश सावंत यांच्या आत्महत्या करण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची शासनाकडून गांभीर्याने दखल

पालकमंत्री नितेश राणे यांची एक्स पोस्टद्वारे माहिती कणकवलीमधील नरडवे येथील पाटबंधारे प्रकल्पग्रस्त प्रकाश सावंत यांनी काल मुंबई उच्च न्यायालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना धक्कादायक आहे. या घटनेची शासनस्तरावर गंभीर दखल घेण्यात आली असून सदर प्रकरणी श्री. सावंत यांना कायद्याच्या चौकटीत…

कुडाळमध्ये ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रवेश घेण्याचे आवाहन

जिल्हा ग्रंथालय येथे आयोजन : मुदत ३१ डिसेंबर पर्यंत वाढविली महाराष्ट्र शासन मान्य सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ आणि कोकण विभाग ग्रंथालय संघ यांच्या शिफारशीने राव बहाददूर अनंत शिवाजी देसाई वाचनालय (जिल्हा ग्रंथालय) कुडाळ या संस्थे मार्फत ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा २०२६…

राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत लोकजीवन समजून घ्या – प्रफुल्ल वालावलकर

बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या एनएसएस शिबिराचा नेरूर येथे शुभारंभ राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत समाजात वावरत असताना तेथील लोक जीवन समजून घ्या. राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या रूपाने निसर्गात, लोकांमध्ये मिसळण्याची सुवर्णसंधी चालून आलेली आहे तिचा लाभ घ्या. आजच्या पिढीमध्ये श्रमप्रतिष्ठा…

error: Content is protected !!