रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्ष पदी बाबाजी भिसळे तर कार्यवाह पदी अर्जुन बापर्डेकर बिनविरोध

आचरा
रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिराच्या पदाधिकाऱ्यांची निवड वाचनालयात झालेल्या कार्यकारीणीच्या बैठकीत बिनविरोध करण्यात आली.यावेळी अध्यक्षपदी बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष पदी अशोक कांबळी , कार्यवाह पदी अर्जुन बापर्डेकर तर सहकार्यवाह पदी विरेंद्र पुजारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
वाचन मंदिरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी संस्थेच्या ९ कार्यकारिणी सदस्यांची निवड केलेली होती. आज संस्थेत सदर सदस्यांची सभा होऊन पदाधिकारी निवडण्यात आले. यात निवड झालेल्या नुतन पदाधिकारयांसह सदस्य सौ उर्मिला सांबारी,श्रीमती वैशाली सांबारी,जयप्रकाश परुळेकर,भिकाजी कदम,सौ दिपाली कावले उपस्थित होते . नुतन पदाधिकारी आणि कार्यकारीणीचे
संस्थेचे कर्मचारी, सांस्कृतिक समिती सदस्यांनी अभिनंदन केले.