सावंतवाडी नगरपालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गेल्या दोन महिन्याचा पगार झाला नसल्याने नगरपालिकेसमोर पुकारले काम बंद आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिली भेट

सावंतवाडी : सावंतवाडी येथील नगरपालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गेल्या दोन महिन्याचा पगार झाला नसल्याने आज त्यांनी नगरपालिकेसमोर काम बंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी
कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून आपण तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
तसेच या आंदोलनाला ठाकरे शिवसेनेचा पाठिंबा याला होता . यावेळ कर्मचाऱ्यांनी गेले दोन महिने आम्हाला पगार नसल्याने
आम्ही कुटुंब चालवायचा कसं असा सवाल केला आहे. तसेच साडेतीन वर्षाचा पीएफ देखील अदा केला गेला नाही. दरम्यान,
कॉन्ट्रॅक्टराने नगरपालिकेला बिल सादर केलं नसल्याने कर्मचाऱ्यांना पगाऱ्यापासून वंचित राहावे लागल्याचे नगरपालिकेकडून
स्पष्टीकरण करण्यात आले आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टरला नोटीस बजावून देखील त्यांनी नगरपालिकेला सहकार्य केले नसल्याचेदेखील नगरपालिका प्रशासनाचे सांगितले.यावेळी हिमायतुल्ला खान इफ्तिकार राजगुरु काशिनाथ दुभाषी,राकेश
नेवगी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!