पर्यटनदृष्ट्या वेंगुर्ले तालुक्याचा विकास करणार!

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांची माहिती

आज वेंगुर्ला येथे तालुका राष्ट्रवादीची बैठक राष्ट्रवादीचे नेते एम के गावड़े यांच्या कार्यालया मधे घेण्यात आली. त्यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व कार्याध्यक्ष काका
कुडाळकर यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाच्या पुढील वाटचाली बाबत माहिती दिली. जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी सांगितले, जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन संघटना वाढवण्यात येईल. सर्वाना विश्वासात घेऊन काम करणार . सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणून एम के गावडे यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. गावडे यांनी श्रीमती प्रज्ञाताई परब यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काथा उद्योग सुरू केला. या उद्योगाच्या माध्यमातून अनेक महिला बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचे बहुमूल्य कार्य त्यांनी केले आहे.
श्री गावडे यांनी यापूर्वी जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष म्हणूनही यशस्वीरित्या काम केले आहे. प्रज्ञा परब यांनीही जिल्हा बँकेचे संचालक म्हणून सहकार क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा विशेषता वेंगुर्ला तालुका पर्यटन दृष्ट्या जगाच्या नकाशावर यावा यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
आज राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असून श्री गावडे व प्रज्ञा परब यांचे सिंधुदुर्ग विकासासाठीचे संकल्प आहेत ते पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने त्यांच्या पाठीशी उभे राहून त्याची आपण ग्वाही दिली. कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी बोलताना सांगितले की, राष्ट्रवादी संघटना एकसंघपणे वाढविण्याचे काम आम्ही चालू केले आहे. काही कालावधीत आम्ही राष्ट्रवादीच्या मेळाव्याचे नियोजन करणार. एम के गावड़े यांनी बोलताना सांगितले की राष्ट्रवादी पक्ष संघटना एक जुटीने वाढवण्यात येईल. आंबा काजू शेतकरी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार. त्यावेळी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर, राष्ट्रवादी नेते एम के गावड़े, माजी जिल्हा बँक संचालिका सौ प्रज्ञा परब,माजी जिल्हा बैंक संचालक प्रमोद धुरी वेंगुर्ला राष्ट्रवादी माजी तालुका अध्यक्ष धर्माजी बागकर, पावस्कर, राष्ट्रवादी कणकवली शहर अध्यक्ष इम्रान शेख़, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य सावळाराम अनावकर, राष्ट्रवादी कणकवली माजी तालुका अध्यक्ष विलास गावकर, माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत माजी राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे,सूरज परब,सुभाष तांडेल,दादा गावड़े आदि उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!