मुलांचे स्पर्धा परीक्षा माध्यमातून भवितव्य घडवा-दीपक भोगटेनांदोस गावकरवाडा शाळेत गुरुपौर्णिमा व साहित्य प्रदान सोहळा संपन्न

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदोस गावकरवाडा ता.मालवण प्रशालेत गुरुपौर्णिमा व साहित्य प्रदान सोहळा संपन्न झाला. शाळेस पंचवीस हजाराचे संगीत वाद्य साहित्य ,मुलांना शैक्षणिक साहित्य व दत्तक मुले निधी प्रदान यावेळी करण्यात आला.
आजच्या युगात स्पर्धा परीक्षा हे मुलांचे भवितव्य उज्ज्वल घडविण्याचे माध्यम आहे.पहिलीपासूनच मुलांना स्पर्धा परीक्षेची ओळख करून द्यायला हवी.शासनाच्या व खाजगी विविध स्पर्धा परीक्षेतून मुलांचा पाया घडविणे आज गरजेचे आहे असे प्रतिपादन सामाजिक व शैक्षणिक चळवळीतील कार्यकर्ते दीपक भोगटे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून व्यक्त केले.नांदोस गावकरवाडा शाळेत गुरुपौणिमा व साहित्य प्रदान सोहळा संपन्न झाला यावेळी कै.बाळकृष्ण विश्राम भोगले आणि कै.सौ.सुनिता बाळकृष्ण भोगले (बांधवाडी) यांच्या स्मरणार्थ कु.संजीव भोगले (नातू) यांचेकडून पंचवीस हजाराचे संगीत साहित्य शाळेस प्रदान करण्यात आले.तसेच श्री.दीपक भोगटे यांचेकडून मुलाच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले.श्री.सुभाष तुकाराम गावडे व श्री.बाळा गावडे यांनी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेसाठी शाळेस निधी प्रदान केला.यावेळी कार्यक्रमास नांदोस सरपंच माधुरी चव्हाण,माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते हेमंत माळकर,शाळा व्यवस्थापन अध्यक्षा नमिता नांदोसकर,सौ.भोगटे,शैलेश बिबवणेकर,संभाजी गावडे,महेश माधव,श्री.सांडव,अनंत कदम,झिलू खोत,प्रकाश गावडे,विनायक कांबळी,अनिता चिंदरकर,दीपिका ढोलम,ऋतुजा बुटे,वैशाली माने,छाया गावडे,संजना नांदोसकर,अर्चना गावडे आदी उपस्थित होते.यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत मुख्याद्यापक तानाजी गावडे यांनी केले.हेमंत माळकर यांनीही आपले विचार प्रकट केले.यावेळी शाळेस मदत केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक चंद्रसेन पाताडे यांनी केले..शेवटी आभार मुख्या. तानाजी गावडे यांनी मानले.

संतोष हिवाळेकर / पोईप

error: Content is protected !!