नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपला तरी जनतेशी असलेली बांधिलकी तुटू देणार नाही!

राष्ट्रवादी नेते नगरसेवक माजी नगरसेवक अबीद नाईक यांच्या माध्यमातून शिवाजीनगर जळकेवाडी मधील ट्रि कटिंग

या भागातील जनतेमधून देखील समाधान व्यक्त

कणकवली नगरपंचायत च्या नगरसेवक पदाचा माझा कार्यकाळ संपला तरी माझं सामाजिक काम हे थांबणार नाही. माझं सामाजिक कार्य हे अविरत सुरू राहणार. गेल्या वीस वर्षात या भागात स्ट्रीट लाईट नव्हती ती पूर्ण करून घेतली. ज्या जनतेने मला नगरसेवक पदापर्यंत पोहोचण्याची संधी दिली या जनतेशी बांधिलकी ठेवून मी यापुढे देखील कार्यरत राहणार. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी देखील मला सातत्याने निधी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले. असे उद्गार राष्ट्रवादीचे नेते व माजी नगरसेवक अबीद नाईक यांनी काढले. कणकवली शहरातील शिवाजीनगर, जळकेवाडी भागातील मान्सूनपूर्वक ट्रि कटिंग ची कामे अबीद नाईक यांच्या पाठपुराव्यातून हाती घेण्यात आली. यावेळी या भागातील नागरिकांनी देखील अबीद नाईक यांच्या सातत्यपूर्ण कामाबद्दल व सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. पावसाळ्यात सातत्याने या भागातील विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडत होता. मात्र याबाबत कायमस्वरूपी मार्ग काढण्याकरता येथील स्थानिक जनतेशी चर्चा करून झाडांच्या फांद्या तोडून घेण्याचे काम हाती घेण्यात आले. अशी माहिती श्री नाईक यांनी दिली. यावेळी प्रा. दिवाकर मुरकर, मिलिंद वालावलकर, नितीन नाईक यांच्यासह अन्य स्थानिक नागरिक देखील उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!