मणेरी येथे वाहनाच्या धडकेत लांडगा मृत्युमुखी

दोडामार्ग : दोडामार्ग बांदा राज्यमार्गावरील मणेरी येथे मंगळवारी रात्री अज्ञात वाहनाने एका लांडग्याला धडक दिली. त्यात तो मृत्युमुखी पडला. ती घटना पत्रकार समीर ठाकूर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती दोडामार्ग वनक्षेत्रपाल अनुप कन्नमवार यांना दिली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्या लांडग्याला मृत घोषित केले. त्यानंतर वनविभागाकडून रीतसर पंचनामा करून शवविच्छेदन केल्यानंतर दहन करण्यात आले.

error: Content is protected !!