सावंतवाडी तालुक्यातील तळवणे मळेवाड कोंडूरा धाकोरा भागात भागात सुरू असलेल्या बेकायदा (चिरे )गौण उत्खनना बाबत मनसे कडून ५ जूनला आंदोलन छेडण्याचा इशारा

माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक यांची माहिती

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील तळवणे मळेवाड कोंडूरा धाकोरा भागात शासनाचा महसूल बुडवून बेकायदा (चिरे )गौण उत्खनन सुरू असतांनाही महसूलकडून कोणतीही दखल न घेता चिरे खाण मालकांना पाठीशी घालणाचा प्रयत्न केला जात असल्याने मनसेच्या माध्यमातून येथील तहसिल कार्यालयासमोर ५ जूनला आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे आरोस माजी विभागअध्यक्ष मंदार नाईक व धाकोरे कोंडुरा तळवणे येथील मनसेच्या स्थानिक पदाधिकारी यांनी दिला आहे.

error: Content is protected !!