चिंचवली ग्रामस्थांकडून आमदार नितेश राणे यांचा सत्कार

आ.नितेश राणे यांच्या प्रयत्नातून चिंचवली गुरववाडी येथील सभागृह उभारणीसाठी १० लाख रुपये मंजूर
कणकवली तालुक्यातील चिंचवली गुरववाडी येथील सभामंडपासाठी आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२३-२४ अंतर्गत स्थानिक भाजपा आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून स्थनिक स्वराज्य संस्थेच्या जागेत सांस्कृतिक सभामंडप बांधण्याकरिता १० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आल्याबद्दल चिंचवली गुरववाडी रहिवाशांनी खारेपाटण विभाग भाजपा शक्ती केंद्र प्रमुख सुर्यकांत भालेकर यांच्या उपस्थित आमदार नितेश राणे यांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी जाऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन आभार व्यक्त केले.
आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम २०२३-२४ अंतर्गत आमदार नितेश राणे यांनी चिंचवली गुरववाडी येथील सभामंडप प्रस्तावित केला होता. त्याला नुकतीच जिल्हा नियोजन अधिकारी सिंधुदुर्ग यांनी १० लाख रुपये निधी मंजूर केल्याच्या पार्श्वभूमीवर चिंचवली गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करुन सुर्यकांत भालेकर यांच्या नेतृत्वाखाली माजी ग्रामपंचायत सदस्य तुकाराम गुरव, योगेश गुरव, श्रीकांत भालेकर, चंद्रकांत गुरव, अमोल गुरव, राजेश गुरव, सुहास गुरव, युवराज गुरव यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आम्हां तिन्ही राणेंच्या सुर्यकांत भालेकर नेहमीच संपर्कात असून, विभागातील विकास अन् अडचणी निवारण संदर्भात प्रयत्नशील असल्याचे गौरवोद्गार काढून आमदार नितेश राणे यांनी सुर्यकांत भालेकर यांचे कौतुक केले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण