ठाकरे गटाचे जिल्हा मजूर संघाचे संचालक आत्माराम बालम भाजप मध्ये

आमदार नितेश राणेंचा ठाकरे गटाला धक्का

ठाकरे गटाचे सिंधुदुर्ग जिल्हा मजूर संघाचे संचालक कसाल येतील आत्माराम बालम यांनी आज भारतीय जनता पार्टीत आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. आत्माराम बालम यांच्या पक्षप्रवेशामुळे सहकार क्षेत्रात ठाकरे गटाला आमदार नितेश राणे यांनी जोराचा झटका दिला आहे. या प्रवेशामुळे सिंधुदुर्ग जिल्हा मजूर संघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांची संख्या आणखीनच वाढली आहे.
आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा मजूर संघाचे संचालक आत्माराम बालम यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, भाजपचे तालुका उपाध्यक्ष शशी राणे देवगडच्या माजी नगराध्यक्ष प्रणाली माने मिलिंद माने आधी उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!