गायक अमित लाखो यांनी वाढवली कोकण नाऊ आयोजित “कोकण नाऊ सावंतवाडी महोत्सवाची” रंगत.

सावंतवाडी/मयुर ठाकूर.
कोकण नाऊ चॅनल आयोजित सावंतवाडी महोत्सव 2023 नुकताच सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर संपन्न झाला.या महोत्सवांमध्ये ऑटो एक्स्पो, गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल, खाद्यपदार्थ स्टॉल अर्थातच फूड फेस्टिवल,मनोरंजन जत्रा आणि स्थानिक लोककलाकारांचे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये खेळ पैठणीचा,रेकॉर्ड डान्स स्पर्धा,फॅशन शो असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.या महोत्सवादरम्यान अमित रघुनाथ लाखो राहणार लाखोवस्ती यांनी आपली गायन मैफिल सादर केली होती.अमित लाखो यांना लहानपणापासून गायनाची आवड होती.गारवा आणि और इस दिल में क्या रखा है या दोन गाण्यांनी त्यांच्यात गायनातील रुची वाढली.गायन क्षेत्रांमध्ये श्री कपिल कांबळे,समीर चराटकर व नेहा आजगावकर त्याचबरोबर,मुंडे सर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.सध्या यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये ग्रंथपाल या पदावर कार्यरत असलेले अमित लाखो यांनी महोत्सवांमध्ये आपल्या संगीत मैफिलीने चाहत्यांची मने जिंकली.सारेगामापा फेम आर्या आंबेकर,रोहित राऊत त्याचबरोबर चैतन्य कुलकर्णी,नचिकेत देसाई, प्रल्हाद जाधव,विजय गटलेवार अशा अनेक दिग्गज गायक कलाकारांसोबत यापूर्वीही लाखो यांनी गायनाचे कार्यक्रम केले होते.