कोकण नाऊ मालवण महोत्सवात २९ मे रोजी खुली एकेरी नृत्य स्पर्धा

प्रतिनिधी । मालवण : कोकण नाऊ आयोजित मालवण महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मालवणवासियांना अनुभवायला मिळणार आहे. हा महोत्सव 25 मे ते 31 मे या कालावधीत मालवणच्या बोर्डिंग मैदानावर होत आहे. खाद्य महोत्सव आणि घरगुती वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री याबरोबरच ऑटो एक्सपो मनोरंजन जत्रा असे या महोत्सवाचे स्वरूप असणार आहे. सोमवार दि. २९ मे रोजी खुल्या एकेरी नृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
२९ मे रोजी एकेरी खुली नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी साडेसहा वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. बारा वर्षाखालील लहान गट व बारा वर्षांवरील मोठा गट अशा दोन गटांमध्ये स्पर्धा होईल. बारा वर्षाखालील लहान गटातील प्रथम विजेत्याला दोन हजार रुपये द्वितीय विजेत्याला दीड हजार रुपये तृतीय विजेत्याला एक हजार रुपये तर बारा वर्षावरील मोठ्या गटातील विजेत्यांना प्रथम 3000 द्वितीय 2000 व तृतीय 1000 अशी बक्षीस दिली जातील. याबरोबरच आकर्षक चषक आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहेत.
“कोकण नाऊ चॅनेल ने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी 9370440893 / 9422434260 यां संपर्क क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन कोकण नाऊच्या संचालिका वैशाली गावकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!