कोकण नाऊ मालवण महोत्सवात २८ मे रोजी रंगणार खेळ पैठणीचा

प्रतिनिधी । मालवण : कोकण नाऊ आयोजित मालवण महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मालवणवासियांना अनुभवायला मिळणार आहे. हा महोत्सव 25 मे ते 31 मे या कालावधीत मालवणच्या बोर्डिंग मैदानावर होत आहे. खाद्य महोत्सव आणि घरगुती वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री याबरोबरच ऑटो एक्सपो मनोरंजन जत्रा असे या महोत्सवाचे स्वरूप असणार आहे. रविवार दि. २८ मे रोजी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
२८ मे रोजी संध्याकाळी सात वाजता खेळ पैठणीचा हा बहारदार कार्यक्रम मालवणवासीयांना अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे मालवण शहरात प्रथमच संगीत वाद्यांच्या साथीने हा कार्यक्रम होणार असून या स्पर्धेतील विजेत्याला मानाची पैठणी बहाल करण्यात येणार आहेत. याबरोबरच आकर्षक बक्षीस व भेटवस्तू देण्यात येणार आहेत. बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य आहे.
“कोकण नाऊ चॅनेल ने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी 9370440893 / 9422434260 यां संपर्क क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन कोकण नाऊच्या संचालिका वैशाली गावकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!