ज्येष्ठ नागरिकांना सर्वतोपरी पोलीस प्रशासनाकडून सहकार्य मिळेल

डीवायएसपी विनोद कांबळे यांचे ज्येष्ठ नागरिकांना आश्वासन

कणकवली डी वाय एस पी कार्यालयात जेष्ठ नागरिकांची बैठक

ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडचणी व समस्या निवारणासाठी पोलीस प्रशासनाकडून लागणारी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. ज्येष्ठ नागरिकांना कायदेशीर मार्गदर्शना सोबतच त्यांना आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधा पुरविण्याबाबत देखील संबंधित विभागांशी येत्या काळात समन्वय साधला जाईल. व ज्येष्ठ नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून यापूर्वी होते तसेच यापुढे देखील सहकार्य दिले जाईल असा विश्वास उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी व्यक्त केला. कणकवली डीवायएसपी कार्यालय येथे नुकतीच पोलीस प्रशासना च्या वतीने जेष्ठ नागरिकांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री. कांबळे बोलत होते. याप्रसंगी प्रभारी कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुदळेकर, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे दादा कुडतरकर, अशोक करंबळेकर, श्री. रेगे, एस टी सावंत, सखाराम सपकाळ, पोलीस हवालदार किरण मेथे, यांच्यासह अन्य जेष्ठ नागरिक उपस्थित होते. पोलीस प्रशासन व जनता यामध्ये समन्वय व संवाद रहावा या अनुषंगाने डीवायएसपी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. जेणेकरून समाजातील विविध घटकांसोबतच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात व त्यांना येणाऱ्या अडचणी शक्यतो मार्गी काढता याव्यात हा या बैठकी मागील उद्देश असल्याचे श्री. कांबळे यांनी सांगितले. यावेळी जेष्ठ नागरिकांनी देखील काही समस्या मांडून चर्चा केली.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!