यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या तुषार पवार यांच्या वडिलांचा सत्कार

माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांच्याकडून करण्यात आला गौरव
प्रतिकूल स्थितीत शिक्षण घेत यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या तुषार दीपक पवार याच्या वडिलांचा सत्कार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. दीपक पवार हे कणकवली खरेदी विक्री संघात कर्मचारी असून, त्यांच्या मुलगा तुषार याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत यूपीएससी परीक्षेत यश मिळवले. त्याच्या या यशाबद्दल हा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक गणेश तावडे, माजी नगरसेविका कविता राणे आदि उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर/कणकवली





