बारावी परीक्षेत तालुक्यात तृतीय आलेल्या सानिका सावंत हिचा माजी नगराध्यक्षांकडून सत्कार

मिळवलेल्या यशाबद्दल केले कौतुक

कणकवली तालुक्यात कणकवली महाविद्यालयातील सानिका दत्ताराम सावंत हिने विज्ञान शाखेत ९३.५० टक्के गुण मिळवत तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच सानिका हिने अहोरात्र घेतलेल्या या मेहनतीबद्दल विशेष कौतुक केले. यावेळी तिचे आजोबा सत्यवान राणे, आई रश्मी सावंत, शहराध्यक्ष अण्णा कोदे, अजय गांगण, शिशिर परुळेकर, महेश सावंत, संदीप राणे आदी उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!