अश्लील एसएमएस व व्हिडिओ पाठवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या कलमठ मधील युवकाला जामीन

संशयित आरोपीच्या वतीने ऍड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद
एका युवतीला व्हाट्सअप वर अश्लील एसएमएस व व्हिडिओ पाठवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विराज हिंदळेकर (31 कलमठ वरची कुंभारवाडी) याची सशर्थ जमिनीवर मुक्तता करण्यात आली. संशयित आरोपीच्या वतीने ऍड. अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले. याबाबत 20 मे रोजी इतर गुन्हा घडला होता. त्याबाबत पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपीच्या विरोधात 354 अ, 354 ड, व माहिती तंत्रज्ञानाच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या बाबत आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची सशर्थ जमिनीवर मुक्तता करण्यात आली. आरोपीच्या वतीने ऍड. अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले.
दिगंबर वालावलकर /कणकवली