१२१ शाळांच्या शिक्षक प्रश्नी आ. वैभव नाईक, सतीश सावंत उद्या घेणार जि.प.मुख्य कार्यकाऱी अधिकाऱ्यांची भेट

सिंधुदुर्ग मध्ये शाळेतील प्रश्न होणार गंभीर

     आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत शिक्षक बदली धोरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ शाळांमध्ये जूनपासून एकही शिक्षक  उपलब्ध असणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. हा गंभीर प्रश्न असून याबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत हे उद्या बुधवार दि. २४ मे रोजी सकाळी ११:०० वाजता ओरोस येथे जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांची भेट घेणार आहेत.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!