कर्नाटक मधील काँग्रेसच्या विजयाचा कणकवलीत जल्लोष

भाजपाला कर्नाटक मध्ये धक्कादायक पराभवाला जावे लागले सामोरे

कणकवलीत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

कर्नाटक मध्ये भाजपाला मोठ्या पराभवाचा धक्का बसल्यानंतर काँग्रेस कर्नाटक मध्ये स्पष्टपणे बहुमत मिळून सत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली तालुका काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीत पटवर्धन चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेसच्या कर्नाटक मधील विजयाचा आनंदोत्सव कणकवली साजरा करण्यात आला. याप्रसंगी तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्यासह युवासेनेचे राजू राठोड, प्रदीपकुमार जाधव, महेश तेली, अजय मोर्ये, राजू वरने, निलेश मालडकर, निसार शेख,आदी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!