महामार्गावर कंटेनर पलटी होत अपघात

सुदैवाने कंटेनर चालक बचावला
महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीचे चुकीचे काम ठरतेय अपघाताला कारणीभूत
मुंबई गोवा महामार्गावरून सिमेंट वाहतूक करणारा कंटेनर हायवेच्या डिव्हायडर वर चढल्याने महामार्गावर कंटेनर डिव्हायडर वर जाऊन पलटी झाला. या अपघातात कंटेनर चालकाला सुदैवाने किरकोळ दुखापत झाली. मात्र कंटेनर चे मोठे नुकसान झाले. हा अपघात आज शुक्रवारी सकाळी 6.30 वा. च्या सुमारास महामार्गावर जानवली रतांबी व्हाळ येथे घडला. अपघातानंतर सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास महामार्ग पोलीस दाखल झाले होते. महामार्गावर केलेल्या लहान कमी उंचीच्या डिव्हायडर मुळे आतापर्यंत अनेकदा अपघात झाले असून, याकडे महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी यांचे दुर्लक्ष होत आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली





