प्रकाश गवस यांना पोलीस पदक प्रमाणपत्र प्रदान

जिल्हाधिकाऱ्यानी केले वितरण
वाहतूक पोलीस प्रकाश गवस यांच्यावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणारे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी प्रकाश गवस यांना पोलीस महासंचालकांकडून यापूर्वी जाहीर झालेल्या पोलीस पदकाचे प्रमाणपत्र नुकतेच जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पोलीस दलात उत्कृष्ट काम केलेल्या वीस जणांना पोलीस महासंचालकांकडून पोलीस पदक जाहीर करण्यात आली होती. यामध्ये प्रकाश गवस यांचा देखील समावेश होता. श्री. गवस यांनी पोलीस दलात उत्कृष्ट काम करत असतानाच लोकाभिमुख काम करण्यावर त्यांचा नेहमीच भर असतो. जिल्हाधिकारी यांनी पोलीस पदकाचे प्रमाणपत्र वितरण करत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या घराबद्दल गौरवा बद्दल सर्व स्तरातून श्री. गवस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली





