शरद पवार हे राष्ट्रवादीचा पंचप्राण !

शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडू नये !, सिंधुदुर्ग जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमध्ये एकमताने ठराव मंजूर

कुडाळ ; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला. या पुस्तक प्रकाशनावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याची मोठी घोषणा केली. या महत्वाच्या राजकीय घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही राष्ट्रवादीच्या नेत्यांची तसेच पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक कुडाळ येथील पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पार पडली.
यावेळी यावेळी प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर म्हणाले की, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक निवृत्तीची घोषणा केली. यामुळे याचा झटका सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांना बसला आहे. शरद पवार हे राष्ट्रवादीचा पंचप्राण असून पक्षाचा विचार आहेत. तसेच ते राष्ट्रवादीचे दिशा असून भवितव्य आहेत. त्यामुळे तमाम कार्यकर्त्यांचे भवितव्य घडवायचे असेल तर राष्ट्रवादीचे अध्यक्षपद शरद पवार यांनीच स्वीकारले पाहिजे.
कार्यकर्त्यांच्या भावना, तळागाळातील शेतकरी प्रश्न, राजकारणाची दिशा ओळखणे आणि राष्ट्रवादीमधील कार्यकर्त्याच्या मानसन्मानासाठी पक्ष पुढे नेणारा नेता आमचा नेता असू शकतो. त्यामुळे एकमताने सर्वानी ठराव मंजूर केला आहे की, राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद हे शरद पवार यांनी सोडू नये. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा शरद पवार यांच्या पाठीशी आहे, अशा भावना प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर व्यक्त केल्या
यावेळी प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, प्रदेश सदस्य तथा जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर, साबा पाटकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, सुधाकर कर्ले, देवेंद्र टेमकर, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, कणकवली विधानसभा अध्यक्ष डॉ. अभिनंदन मालंडकर, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, शफिक खान, जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.

रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!