२०२३ मधील दुसरे राष्ट्रीय लोकअदालत जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्ग येथे संपन्न

२०२३ मधील दुसरे राष्ट्रीय लोकअदालत जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्ग येथे संपन्न
सिंधुदुर्गनगरी ; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, रविवारी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी ठरवून दिलेल्या शेड्युल नुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग व तालुका विधी सेवा समिती यांच्या वतीने जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयांमध्ये सन २०२३ या वर्षातील दुसरे राष्ट्रीय लोकअदालत संपन्न झाले.
सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गचे अध्यक्ष एस्. जे. भारुका यांच्या निगराणीखाली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग चे सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश सन्माननीयडी. बी. म्हालटकर यांच्या देखरेखीखाली जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्ग येथे दोन पँनेल्स बनवण्यात आली.
पँनेल क्रमांक १ हे जिल्हा न्यायाधीश २ व सहायक सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग यांचे न्यायदान कक्षात ठेवण्यात आले होते. या पँनेलचे प्रमुख म्हणून व्ही. एस्. देशमुख, जिल्हा न्यायाधीश २ व सहायक सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग यांची नेमणूक करण्यात आली होती व पँनेल सदस्य म्हणुन विधीज्ञ यतिश रत्नाकर खानोलकर हे होते. या पँनेलमध्ये मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग यांचे न्यायालयातील, जिल्हा न्यायाधीश- १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग यांचे न्यायालयातील व जिल्हा न्यायाधीश -२ व सहायक सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग यांचे न्यायालयातील तडजोड होवु शकतील अशी प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये फौजदारी अपीले, मोटर अपघात क्लेमची प्रकरणे, नियमित दरखास्त प्रकरणे, दिवाणी अपीले अशी प्रकरणे ठेवण्यात आली होती. एकुण ५०३ प्रकरणे ठेवण्यात आली होती.
तसेच पँनेल क्रमांक २ हे मा. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सिंधुदुर्ग तथा मुख्य न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग यांचे न्यायदान कक्षात ठेवण्यात आले होते. या पँनेलमध्ये दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर सिंधुदुर्ग यांचे न्यायालयातील, मुख्य न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग यांचे न्यायालयातील, ग्राहक तक्रार निवारण आयोग सिंधुदुर्ग यांचे न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. तसेच वादपुर्व प्रकरणे ज्यामध्ये बँका, वित्तीय संस्था, वीज वितरण कंपनी, ग्रामपंचायत, पाणीपुरवठा व पोलीस चलनांची प्रकरणे ठेवण्यात आली होती. प्रलंबित प्रकरणांमध्ये नियमित दिवाणी दावे, स्पेशल दिवाणी दावे, नियमित दरखास्त प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे, विवाह विच्छेदन प्रकरणे, फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, चलनक्षम दस्तऐवज कायदा कडील प्रकरणे ठेवण्यात आली होती.
सदर राष्ट्रीय लोक अदालत मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणे एकुण ३४६७ ठेवण्यात आली होती व त्यापैकी २५४ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. तसेच तडजोडीने वसुल झालेली एकुण रक्कम रु.१ कोटी ७० लाख ४५ हजार ०५८/- एवढी वसुली झाली.
तसेच वादपुर्व प्रकरणे एकुण ५९७८ ठेवण्यात आली व त्यापैकी एकुण ६२३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या तडजोडीने वसुल झालेली एकुण रक्कम रु. ४२ लाख २९ हजार १५७/- एवढी वसुली झाली. या लोक अदालतीमध्ये एकुण ९४४५ प्रकरणांपैकी ८७७ प्रकरणे तडजोडीने निकाली होऊन सदर प्रकरणाची तडजोडीची एकुण रक्कम २ कोटी १२ लाख ७४ हजार २१५ एवढी वसुली झाली.
या राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी एस्. जे. भारुका प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग, एस. एस. जोशी, जिल्हा न्यायाधीश- १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग, मा. डी. बी. म्हालटकर सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग, व्ही. एस्. देशमुख जिल्हा न्यायाधीश -२ तथा सहायक सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग, ए. बी. कुरणे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा मुख्य न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शिरस्तेदार सुनिल तांबे, विश्वनाथ परब, मडवळ, अमृता हुले, वाहनचालक दिनेश खवळे, गिरीश परब, तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सिंधुदुर्ग, बँक अधिकारी, वित्तीय संस्थाचे अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गचे अधीक्षक व्ही. डी. कदम, वरिष्ठ सहायक एस. एन. पालव, आर. जी. कानसे, कनिष्ठ लिपिक कु. रंजना परब, चपराशी जी. डी. कदम, विधी स्वयंसेवक करुणा परब, बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत कर्मचारी गायत्री मठकर, पुजा मांजरेकर, चपराशी सिध्देश धुरी, तसेच चपराशी दशरथ सरवणकर, महादेव करंगुटकर, देवेंद्र चव्हाण यांनी जिल्हा न्यायालयमधील आयोजित राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. या सर्वांचे आभार संजय भारुका, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग यांनी मानले.
प्रतिनिधी, सिंधुदुर्गनगरी