अखेर जानवलीतील साईसृष्टी नजीक ट्रान्सफार्मर चे काम मार्गी

आमदार नितेश राणे यांनी या ठिकाणच्या नागरिकांना दिला होता शब्द
सरपंच अजित पवार यांनी केला शुभारंभ
कणकवली तालुक्यातील जानवली साईसृष्टी या ठिकाणी गेली काही वर्षे ट्रान्सफॉर्मर बसवण्याबाबत या ठिकाणच्या नागरिकांकडून मागणी केली जात होती. आमदार नितेश राणे यांनी याबाबत या नागरिकांना नवीन ट्रान्सफॉर्मर देण्याचा शब्द दिला होता. अखेर डीपीडीसीच्या माध्यमातून हा ट्रान्सफार्मर बसविण्यात आला असून, त्याचे लोकार्पण आज जानवली सरपंच अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या ट्रान्सफार्मर च्या मागणीसाठी गेली अनेक वर्ष या भागातील नागरिक सातत्याने पाठपुरावा करत होते. जानवली येथील हा प्रश्न मार्गी लावावा याकरिता या नागरिकांनी आमदार नितेश राणेंची भेट देखील घेतली होती. आमदार नितेश राणे यांनी हे काम मार्गी लावण्याचा आश्वासन दिले होते. राज्यात भाजपा शिवसेनेचा सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यात अनेक विकास कामाला निधी मिळाला त्यात हे काम देखील मंजूर करून आज त्याचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ग्रा प सदस्य नितीन राणे, किशोर दाभोळकर, व्ही. एम. पाटील, हरेश पाटील, सुभाष भंडारे, संतोष सावंत, श्री. चौगुले आदी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर/ कणकवली