डिगस सुर्वेवाडी येथे १ मे रोजी विविध कार्यक्रम

दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन
कुडाळ :
डिगस सुर्वेवाडी येथील श्री भवानी माता मंदिर येथील श्री भवानी मातेचा वर्धापन दिन सोहळा सोमवार दि. १ मे २०२३ रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्त जयभवानी उत्कर्ष मंडळ, मुंबई व जय भवानी प्रासादिक भजन मंडळ, डिगस (सुर्वेवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, सकाळी ११ वा. श्रीं ची महाआरती व तिर्थप्रसाद, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ५ वा. लहान मुलांचे कार्यक्रम, ७.३० वा. स्थानिकांची सुश्राव्य भजने. रात्री ८.३० वा. नाईक दशावतार नाट्यमंडळ (झरेबांबर दोडामार्ग) यांचा ‘कुंडभैरव’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन जयभवानी उत्कर्ष मंडळ, मुंबई व जय भवानी प्रासादिक भजन मंडळ, डिगस (सुर्वेवाडी)च्या वतीने करण्यात आले आहे.
प्रतिनिधी, कुडाळ