“गाबीत समाजाचा इतिहास” पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट
गाबीत महोत्सवाचे औचित्य साधून अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ,मुंबईच्यावतीने तयार करण्यात आलेल्या “गाबीत समाजाचा इतिहास”या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार रविंद्र फाटक,अखिल भारतीय गाबीत महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार परशुराम उपरकर,कार्याध्यक्ष श्री.दिगंबर गांवकर,सरचिटणीस श्री.वासुदेव मोंडकर,खजिनदार श्री.नारायण आडकर,गाबीत समाज महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री.सुजय धूरत,सरचिटणीस श्री.बाळा मणचेकर हे उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी