नाणारच्या भूसंपादनाच्या बंदोबस्तासाठी सिंधुदुर्गातून ११० पोलीस कर्मचारी जाणार

कुडाळ ; नाणार येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी उद्या, २४ एप्रिल रोजी जमीन मोजणी होणार आहे. या मोजणीच्या पार्श्वभूमीवर नाणार येथे मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे ११० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले आहेत.
नाणार येथे रिफायनरी प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला या विरोधात सहभागी झाले आहेत. हा प्रकल्प या ठिकाणी होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी आंदोलने सुद्धा केली होती. पण आता या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी जमीन मोजणी होणार असून ती कडक पोलीस बंदोबस्तात केली जाणार आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पोलीस मागविण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ७५ महिला आणि ३५ पुरुष पोलीस कर्मचारी नाणार या ठिकाणी बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले आहेत. महिलांचा आंदोलनात मोठा सहभाग बघून यामध्ये महिला पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणावर तैनात केले जाणार आहेत.
कुडाळ, प्रतिनिधी