सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील काजु बागेस आग

एक लाखाचे झाले नुकसान
सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथे परबवाडी या ठिकाणी काल शनिवारी दुपारी दोन एकर मध्ये असलेल्या काजू बागेस आग लागून जवळपास एक लाखाचे नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकरी अनिल परब, सुनील परब,मकरंद परब या शेतकरी वर्ग यांचा समावेश आहे हे आग कशामुळे लागले हे अद्याप पर्यंत समजू शकले नाही. मात्र या आगित पूर्ण काजू कलम जळून गेली आहे ,त्यामुळे मोठ्या प्रमाणात काजूचे नुकसान झाले आहे, संबंधित काजू बागेचा प्रशासनाने पंचनामा करावा व नुकसान भरपाई द्यावी असे आवाहन तळवडे येथील परब कुटूबिय यांनी केले आहे. यावेळी एवढी मोठ्याने आग् लागली होती की ती आटोक्यात आणणे कठीण झाले होते .परंतु परब कुटुंबीयांनी तात्काळ धाव घेत संबंधित आग आटोक्यात आणली. अन्यथा या ठिकाणी असलेल्या आजूबाजूच्या बागेत हे आग जाऊन मोठ्या प्रमाणात काजू बागेचे तसेच आंबा कलमाचे नुकसान होणार होते. शनिवारी काल दुपारी दोन वाजता आग

लागल्याचे समजले आणि सर्वांची धावपळ झाली.आग विझवण्यासाठी मुन्ना परब.ओंकार परब .सर्वेश परब.बंटी परब.रवी परब.अनिल परब.अक्षय परब. अथर्व परब,अमित परब आणि प्रथा परब यांनी अतोकाठ प्रयत्न करून आगीवर ताबा मिळवला.नाहीतर फार मोठे नुकसान झाले असते.
सावंतवाडी