भाजपच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसाठीच सिंधुदुर्गात अवैध धंदे सुरू आहेत का?

युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांचा सवाल

पुन्हा एकदा भाजपच्या पदाधिकाऱ्या विरोधात अवैध दारू विक्री प्रकरणी गुन्हा

एकीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे अवैध धंदे बंद करण्याची घोषणा करत असतानाच मात्र त्यांच्याच कार्यकर्त्यांपुरते अवैध धंदे जिल्ह्यात सुरू आहेत काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. कालच तळेरे येथील सागर डंबे या भाजपाच्या ग्रामपंचायत सदस्यविरोधात अवैध दारू वाहतुकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांपूर्वी कणकवलीतील कलमठ मधील एका राणे समर्थकावर अवैध दारू वाहतुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर काही दिवस उलटायच्या आत सलग दुसऱ्यांदा भाजपा ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता अवैध धंदे फक्त भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी पोलीस अधीक्षकांनी खुले ठेवले आहेत का? असा देखील प्रश्न जिल्ह्यातील जनतेतून उपस्थित केला जात आहे. असा आरोप युवासेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी केला आहे. याबाबत उत्तम लोक यांनी म्हटले आहे पालकमंत्री व त्यांचे कुडाळ मालवण चे आमदार असलेले बंधू हे दोघेही अवैध धंद्यांच्या जाहीररीत्या विरोधात बोलत आहेत. परंतु पोलीस अधीक्षक या संपूर्ण प्रकरणात कारवाई करताना दिसत नाहीत. आता तर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये अवैध धंदे करण्याची स्पर्धा लागली आहे काय असा देखील प्रश्न निर्माण होत आहे. सागर डंबे हा जाहीररीत्या भाजपाचे काम करत असून पालकमंत्र्यांसोबत त्याचे अनेक फोटो देखील आहेत. त्यामुळे आता अशा बेकायदेशीर गोव्याहून दारू तस्करी करणाऱ्या भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर पालक मंत्र्यांची भूमिका काय असा सवाल उत्तम लोके यांनी केला आहे. या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पालकमंत्री हकालपट्टी करणार का. की पालकमंत्र्यांचे या अवैध धंद्यांना छुपे पाठबळ आहे किंवा पोलिस निरीक्षक पालकमंत्री मंत्र्यांना जुमानत नाहीत का असा जनतेमध्ये प्रश्न आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी याबाबत भूमिका जाहीर करण्याची मागणी लोके यांनी केली आहे.

error: Content is protected !!