श्री देव कुडाळेश्वर मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण

कार्यक्रमात सर्व स्तरातील नागरिकांनी घेतला सहभाग
शहरातील श्री देव कुडाळेश्वर मंदिराच्या परिसरात श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये भाविक,लोकप्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये विविध प्रकारच्या वृक्षांची परिसरात लागवड करण्यात आली. हि झाडे जागवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळाच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण पूरक असा हा उपक्रम राबवण्यासाठी दानशूर व्यक्तींनी वृक्ष दिले. ही रोपटी विविध प्रकारची होती. मंदिराच्या परिसरामध्ये याचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगरसेवक अभिषेक गावडे, सुरेश राऊळ, आनंद अणावकर, नगरसेवक विलास कुडाळकर, माजी नगरसेवक राकेश कांदे, अश्विनी परब, सुशील परब, भाई काणेकर, अनिकेत घाटकर, महेश राऊळ, आनंद राऊळ, अभी घाटकर, सचिन कोंडसकर, सुशांत राऊळ, महेश कुडाळकर, बाळा कुडाळकर, कपिल परब, योगेश कुडाळकर, उमा कुडाळकर, स्मिता राऊळ, मिलन राऊळ, हर्षदा कुडाळकर, संजीवनी राऊळ, दीपिका वाडकर, मीरा परब, अस्मिता कुडाळकर आदी उपस्थित होते. मंदिरा परिसरात वृक्षारोपण केलेल्या झाडांची जबाबदारी या ठिकाणच्या प्रत्येक व्यक्तीने घेतली आहे. ही झाडे जगली पाहिजेत मोठी झाली पाहिजे यासाठी ही जबाबदारी देण्यात आली आहे.






