पाट हायस्कूल मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी साहित्याचे वाटप

कुडाळ तालुक्यातील पाट हायस्कूलमध्ये कोचरा, पाट, निवती, म्हापण, हुमरमळा, परुळे इत्यादी पंचक्रोशी क्षेत्रातील अगदी दिव्यांग विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. अशा विद्यार्थ्यांना बऱ्याच गरजा असतात. शारीरिक व्यंगाबरोबर आर्थिक परिस्थिती ही गरिबीची असते. अशा मुलांची गरज जाणून सानिका केअरटेकर सेंटर कडून सानिका तुळसकर, श्याम चंद्रकांत तुळसकर, पत्रकार चिन्मय घोगळे पत्रकार यांच्यामार्फत शैक्षणिक साहित्याचे किट वाटप करण्यात आले. यामध्ये वह्या, कंपास बॉक्स, छत्री, टॉर्च आणि दप्तर अशा अशा साहित्याचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे इतर विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सयाजी बोंदर यांनी प्रास्ताविक करताना या मुलांच्या बाबत विद्यालया मार्फत घेतली जाणारी काळजी, मुलांच्या शिक्षणाविषयी घेतलेले धोरण विशद केले. तर संस्था कार्यवाह विजय ठाकूर यांनी संस्थेमार्फत या मुलांना कशा सवलती दिल्या जातात ते सांगितले.
अशा कार्यक्रमामधून आपणाला प्रेरणा मिळते, त्याचप्रमाणे संजीवनी आश्रम मार्फत विविध वृद्धांची सेवा करण्याची ही संधी मिळते असे संस्थेच्या वतीने सानिका तुळसकर यांनी सांगितले. सानिका तुळसकर या पाट हायस्कूलच्या विद्यार्थिनी असून पाट हायस्कूलच्या मुलांसाठी काहीतरी करता आले याचे आपल्याला समाधान वाटते असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसोबत जि.प. सदस्या शिक्षीका यज्ञा साळगावकर, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्पेशल शिक्षक म्हणून असलेल्या रावले मॅडम व इतर शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधी संदीप साळस्कर यांनी केले. तर या कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षिका अंकिता मोडक यांनी मानले.

error: Content is protected !!