कणकवलीत नगरसेवक बंडू हर्णे यांच्या घराच्या छतावर झाडाची फांदी कोसळून नुकसान

मान्सूनपूर्व पावसाचा फटका
आज रविवारी पहाटे च्या सुमारास झालेल्या सोसाट्याचा वारा व मान्सूनपूर्व पावसाच्या सरीमुळे कणकवली शहरातील चौंडेश्वरी मंदिरा नजीकच्या परिसरात असलेल्या नगरसेवक बंडू हर्णे यांच्या घरावर रुद्राक्षाच्या झाडाची फांदी कोसळून काही प्रमाणात छपराचे नुकसान झाले. सकाळी ही कोसळलेली फांदी हटविण्यात आली.





