खासदार विनोद तावडे, आमदार प्रमोद जठार यांच्या अभिनंदनचा ठराव

पंचायत समितीच्या बैठकीत चंद्रहास उर्फ बबलू सावंत व प्रदीप गावडे यांनी मांडला ठराव
राज्यसभेवर नव्याने नियुक्ती झालेले खासदार विनोद तावडे व विधान परिषद वर नियुक्ती झालेले आमदार प्रमोद जठार यांच्या अभिनंदनाचा ठराव कणकवली पंचायत समितीच्या मासिक बैठकीत पंचायत समिती सदस्य चंद्रहास उर्फ बबलू सावंत व प्रदीप गावडे यांनी मांडला. तावडे व श्री. जठार हे दोन्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्वांनाच सार्थ अभिमान असल्याचेही बबलू सावंत व प्रदीप गावडे यांनी या ठरावा दरम्यान सांगितले. सर्व सभागृहाने या ठरावाला अनुमोदन दिले.





