आचरा येथे 1मे रोजी सकल हिंदू संमेलन

हिंदू धर्म परंपरा, संस्कृती आणि मुल्यांचे संवर्धन आणि संरक्षण व्हावे,सकल हिंदू समाज। संघटीत व्हावा या उद्देशाने शुक्रवार 1मे रोजी दुपारी 3.30वा आचरा येथील मांगल्य मंगल कार्यालय येथे दशक्रोशी मधील सकल हिंदूंचे सम्मेलन आयोजित करण्यात आले आहे.
या समेंलना साठी वेदमूर्ती दत्तात्रय महादेव मुरवणे गुरुजी वांयगणी हे अध्यक्ष स्थान भूषविणार आहेत.
प्रमुख अतिथि म्हणून डॉ. सौ. ज्योती बुवा तोरसकर, इतिहास संशोधक, जेष्ठ शिक्षिका, टोपीवाला हायस्कूल मालवण.
प्रमुख वक्ते अर्जुन यशवंत चांदेकर निवृत्त उपमुख्याध्यापक आरपीडी हायस्कूल सावंतवाडी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संघचालक.यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.तरी समस्त सकल हिंदू बंधू भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या हिंदू संम्मेलनाचे नियोजक आणि संयोजक संजय मिराशी, अजित आचरेकर सकल हिंदू समाज आचरा दशक्रोशी यांच्या तर्फे करण्यात आले आहे ‌

error: Content is protected !!