आपत्ती व्यवस्थापनासाठी पावसाळ्यात सर्व विभागांनी सज्ज रहा!

कणकवली प्रांताधिकारी यांच्या सूचना

आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. यामध्ये पावसाळ्यात फोंडाघाट मधील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच दरड कोसळण्यासारखे प्रकार झाल्यास तातडीने उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना करण्यात आल्या. महावितरण ला आपत्तीपूर्व कामे वेळेत पूर्ण करून पावसाळ्यात सुरळीत सेवा देण्यात यावी अशा सूचना करण्यात आल्या.
प्रत्येक ग्रामपंचायतीने आपत्ती आल्यानंतर तातडीने उपाययोजना करण्यासाठी साहित्य खरेदी करावी याबाबत गटविकास अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.
उपविभागीय अधिकारी कणकवली श्री. जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीमध्ये तहसीलदार दीक्षांत देशपांडे तसेच तालुक्यातील सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

error: Content is protected !!