महामार्ग लगतच्या एका गावात जमिनीखाली जमिनीखालून मूर्ती प्रकटल्याचा दावा

आज धार्मिक विधींचे आयोजन
प्रशासनाकडून दखल घेण्याची केली जात आहे मागणी
कणकवली तालुक्यातील महामार्ग लगत एका गावामध्ये जमिनीतून मूर्ती प्रगटल्याचा दावा तेथील एकाने केला आहे. दरम्यान त्यांच्या मित्र परिवाराला ही बातमी समजल्यानंतर अनेकांनी ती मूर्ती पाहण्यासाठी तेथे धाव घेतली. यापूर्वी त्या गावात अशाच प्रकारे एक मूर्ती जमिनीखालून प्रकटल्याचा दावा करण्यात आल्यानंतर या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यामुळे प्रकरण अंगाशी येईल या भीतीने या नव्याने प्रकटलेल्या मूर्तीबाबत मात्र कोणतीही मोठा गाजावाजा केलेला नसला तरी या मूर्तीची आज प्राणप्रतिष्ठापना व धार्मिक विधींचे आयोजन देखील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान अशा प्रकारामुळे पुन्हा एकदा अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असून याबाबत प्रशासनाकडून दखल घेण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.





