खासदार नारायण राणे यांना कणकवलीच्या गांगण दाम्पत्या कडून अनोख्या शुभेच्छा

ओम गणेश निवासस्थानी वाळू शिल्प तयार करत दिल्या अनोख्या शुभेच्छा
वेंगुर्ला येथील वाळू शिल्पकाराने तयार केली व्यक्तिरेखा
लोकनेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचा उद्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा वाढदिवस असताना या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र अशा शुभेच्छांमधून देखील आगळ्यावेगळ्या प्रकारे शुभेच्छा देण्याची संकल्पना कणकवलीच्या माजी नगराध्यक्ष मेघा गांगण व माजी नगरसेवक बंडू गांगण यांनी प्रत्यक्षात आणली. कणकवली येथील ओम गणेश या नारायण राणे यांच्या निवासस्थानी नारायण राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी अनोख्या प्रकारे राबवलेली ही संकल्पना सर्वांच्या चर्चेचा विषय बनली. इतर वेळी समुद्रकिनारी दिसणारे वाळू शिल्प यावेळी थेट ओम गणेश या राणेंच्या निवासस्थानी साकार झाले. वेंगुर्ला येथील वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी नारायण राणे यांचे वाळू शिल्प तयार केले. व ही संकल्पना मांडली कणकवलीतील गांगण दांपत्याने. आगळ्यावेगळ्या प्रकारे गांगण दांपत्याने आपल्या लाडक्या दादांना अमृत महोत्सवी वर्षात पदार्पणानिमित्त शुभेच्छा दिल्या. नारायण राणे यांचे बनविलेले हे वाळू शिल्प सध्या सर्वांचे ओम गणेश वर लक्ष वेधून घेत आहे.





